Thursday, January 19, 2012

पालकाची कोशिंबीर


साहित्य - १ वाटी बारीक चिरलेला पालक, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा ( कांदा पातीचा असेल तर उत्तम ) , १ हिरवी मिरची,  ५/६ कढीपत्त्याची पानं,1 चमचा दाण्याचे कूट, लिंबू, मीठ, १ चमचा साखर, तेल,  हिंग, मोहरी, जिरे

कृती - एका वाडग्यात चिरलेला पालक आणि कांदा एकत्र करावे.एका छोट्या कढाईत १ चमचा तेल घालावे. तेल तापले कि अगदी थोड्याश्या जिरे आणि मोहरीची फोडणी करावी. फोडणीतच मिरची , कढीपत्ता टाकावा. gas  बंद करून किंचित हिंग टाकावा. हि फोडणी मिश्रणावर घालावी. मिश्रणात चवीनुसार मीठ, साखर आणि दाण्याचे कूट टाकावे. चतकोर लिंबाची फोड पिळावी (अर्ध्या लिंबाच्या अर्धे ).


पंचमेली कोशिंबीर


साहित्य - १ गाजर, १ टोमाटो, १ कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी, अर्धी वाटी बारीक चिरलेला पालक,  २ हिरव्या मिरच्या, ५/६ कढीपत्त्याची पानं,२ चमचे दाण्याचे कूट, लिंबू, मीठ, १ चमचा साखर, तेल,  हळद , हिंग, मोहरी, जिरे, कोथिंबीर  

कृती - गाजर किसून घ्यावे. टोमाटो  आणि कांदा बारीक चिरून घ्यावा. एका वाडग्यात गाजर,कांदा,टोमाटो चिरलेला पालक आणि कोबी एकत्र करावे.एका छोट्या कढाईत १ चमचा तेल घालावे. तेल तापले कि अगदी थोड्याश्या जिरे आणि मोहरीची फोडणी करावी. फोडणीतच मिरची , कढीपत्ता टाकावा. gas  बंद करून किंचित हळद आणि हिंग टाकावा. हि फोडणी मिश्रणावर घालावी. मिश्रणात चवीनुसार मीठ, साखर आणि दाण्याचे कूट टाकावे. चतकोर लिंबाची फोड पिळावी (अर्ध्या लिंबाच्या अर्धे ). वरून कोथिंबीर चिरून घालावी.

हि रंगीबेरंगी कोशिंबीर चवीला फार छान लागते.ह्यात वाटलं तर corn  चे दाणे पण घालू शकतो. 

गाजराची कोशिंबीर

साहित्य - १ गाजर, १ टोमाटो,  १ हिरवी मिरची, ५/६ कढीपत्त्याची पानं, १ चमचा दाण्याचे कूट,लिंबू,मीठ, १ सपाट चमचा साखर, तेल,हळद, हिंग,मोहरी,जिरे,कोथिंबीर 

कृती - गाजर किसून घ्यावे. टोमाटो बारीक चिरून घ्यावा. दोन्ही एकत्र करून एका वाडग्यात ठेवावे. एका छोट्या कढाईत १ चमचा तेल घालावे. तेल तापले कि अगदी थोड्याश्या जिरे आणि मोहरीची फोडणी करावी. फोडणीतच मिरची , कढीपत्ता टाकावा. gas  बंद करून किंचित हळद आणि हिंग टाकावा. हि फोडणी गाजरावर घालावी. मिश्रणात चवीनुसार मीठ, साखर आणि दाण्याचे कूट टाकावे. चतकोर लिंबाची फोड पिळावी (अर्ध्या लिंबाच्या अर्धे ). वरून कोथिंबीर चिरून घालावी.

मुळ्याची कोशिंबीर


साहित्य - १ मुळा, १ हिरवी मिरची, ५/६ कढीपत्त्याची पानं, १५-२० डाळिंबाचे दाणे, लिंबू,मीठ, १ सपाट चमचा साखर, तेल,हिंग,मोहरी,जिरे,कोथिंबीर 
कृती - मुळा किसून घ्यावा.  एका छोट्या कढाईत १ चमचा तेल घालावे. तेल तापले कि अगदी थोड्याश्या जिरे आणि मोहरीची फोडणी करावी. फोडणीतच मिरची , कढीपत्ता टाकावा. gas  बंद करून किंचित हिंग टाकावा. हि फोडणी किसलेल्या  मुळयावर घालावी. मिश्रणात चवीनुसार मीठ, साखर आणि डाळिंबाचे दाणे टाकावे. चतकोर लिंबाची फोड पिळावी (अर्ध्या लिंबाच्या अर्धे ) वरून कोथिंबीर चिरून घालावी.
डाळिंबाचे दाणे घातले कि कोशिंबीर छान दिसते आणि खायलाही दाणे छान वाटतात.

काकडीची कोशिंबीर

 साहित्य - १ काकडी, १ हिरवी मिरची, ५/६ कढीपत्त्याची पानं, १ चमचा दाण्याचे कूट, लिंबू,मीठ, १ सपाट चमचा साखर, तेल,हळद,हिंग,मोहरी,जिरे,कोथिंबीर 

कृती - काकडी अगदी बारीक चिरून घ्यावी अथवा किसून घ्यावी.  एका छोट्या कढाईत १ चमचा तेल घालावे. तेल तापले कि अगदी थोड्याश्या जिरे आणि मोहरीची फोडणी करावी. फोडणीतच मिरची , कढीपत्ता टाकावा. gas  बंद करून किंचित हळद आणि हिंग टाकावा. हि फोडणी काकडीवर घालावी. मिश्रणात चवीनुसार मीठ, साखर आणि दाण्याचे कूट टाकावे. चतकोर लिंबाची फोड पिळावी (अर्ध्या लिंबाच्या अर्धे ) वरून कोथिंबीर चिरून घालावी. 

कोशिंबीर शक्यतो मध्यम चमच्याने १ / २ वेळेसच हलवावी . अगदी लहान चमचा वापरला तर जास्त पाणी सुटते.