Thursday, January 19, 2012

पालकाची कोशिंबीर


साहित्य - १ वाटी बारीक चिरलेला पालक, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा ( कांदा पातीचा असेल तर उत्तम ) , १ हिरवी मिरची,  ५/६ कढीपत्त्याची पानं,1 चमचा दाण्याचे कूट, लिंबू, मीठ, १ चमचा साखर, तेल,  हिंग, मोहरी, जिरे

कृती - एका वाडग्यात चिरलेला पालक आणि कांदा एकत्र करावे.एका छोट्या कढाईत १ चमचा तेल घालावे. तेल तापले कि अगदी थोड्याश्या जिरे आणि मोहरीची फोडणी करावी. फोडणीतच मिरची , कढीपत्ता टाकावा. gas  बंद करून किंचित हिंग टाकावा. हि फोडणी मिश्रणावर घालावी. मिश्रणात चवीनुसार मीठ, साखर आणि दाण्याचे कूट टाकावे. चतकोर लिंबाची फोड पिळावी (अर्ध्या लिंबाच्या अर्धे ).


No comments:

Post a Comment