Thursday, January 19, 2012

पंचमेली कोशिंबीर


साहित्य - १ गाजर, १ टोमाटो, १ कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी, अर्धी वाटी बारीक चिरलेला पालक,  २ हिरव्या मिरच्या, ५/६ कढीपत्त्याची पानं,२ चमचे दाण्याचे कूट, लिंबू, मीठ, १ चमचा साखर, तेल,  हळद , हिंग, मोहरी, जिरे, कोथिंबीर  

कृती - गाजर किसून घ्यावे. टोमाटो  आणि कांदा बारीक चिरून घ्यावा. एका वाडग्यात गाजर,कांदा,टोमाटो चिरलेला पालक आणि कोबी एकत्र करावे.एका छोट्या कढाईत १ चमचा तेल घालावे. तेल तापले कि अगदी थोड्याश्या जिरे आणि मोहरीची फोडणी करावी. फोडणीतच मिरची , कढीपत्ता टाकावा. gas  बंद करून किंचित हळद आणि हिंग टाकावा. हि फोडणी मिश्रणावर घालावी. मिश्रणात चवीनुसार मीठ, साखर आणि दाण्याचे कूट टाकावे. चतकोर लिंबाची फोड पिळावी (अर्ध्या लिंबाच्या अर्धे ). वरून कोथिंबीर चिरून घालावी.

हि रंगीबेरंगी कोशिंबीर चवीला फार छान लागते.ह्यात वाटलं तर corn  चे दाणे पण घालू शकतो. 

No comments:

Post a Comment