Tuesday, January 17, 2012

microwave मधील सोपा केक (एक basic कृती)


साहित्य - १ कप मैदा, १ कप पिठी साखर, १ कप साजूक तूप, २ अंडी , १/२ चमचा baking  powder , vanila  essence

कृती -     ज्या भांड्यात केक bake  करायला ठेवायचा आहे त्या भांड्याला आतून तुपाचा हात फिरवावा आणि त्यावर मैदा भुरभुरावा. भांड्याला सगळीकडे मैदा चिकटला गेला पाहिजे.

बारीक चाळणीतून मैदा आणि पिठी साखर ३ वेळेस चालून घ्यावी जेणेकरून मैदा आणि साखर नीट mix  होईल.
 दोन्ही अंडी भरपूर फेटून घ्यावी. पांढऱ्या रंगाचा फेस झाला म्हणजे अंडी नीट फेटली गेली असं समजावे.
त्यात लगेच मैदा आणि साखरेचे मिश्रण टाकावे , baking  powder  आणि तूप घालावे. Vanila  essence  अथवा जो essence  वापरायचा असेल तो घालावा. आता हलक्या हातानेच सगळं एकत्र करावे आणि भांड्यात टाकावे. आता मिश्रण अजिबात ढवळू नये आणि भांडे लगेच microwave  मध्ये ६ मिनिटांसाठी ठेवावे. मिक्रोवावे ची पोवेर ७०० ते ९०० मध्ये चालेल. केक बाहेर काढल्यावर सुरी मधल्या भागात घालून बाहेर काढावी. जर सुरीला मिश्रण चिकटले तर पुन्हा १ मिनिट ठेवावे . ७०० w  वर ६ मिनिटात केक छान होतो.


केक जरासा गार झाल्यावर एका ताटात उलटा करून घ्या आणि सुरीने slice  करून serv  करा.



No comments:

Post a Comment