Monday, January 16, 2012

आवळ्याची सुपारी

साहित्य - डोंगरी आवळे १ kg , आल्याचा तुकडा  ४ ते ५ इंच , जिरे पूड ४ चमचे , मीठ २ चमचे


कृती - आवळे आणि आलं किसून एका भांड्यात एकत्र करावेत. त्यामध्ये मीठ आणि जिरे पूड कालवून सगळे एकत्र करावे. हा कीस सकाळी १० च्या सुमारास उन्हात वाळवायला टाकावा म्हणजे दिवसभराचा उन मिळेल. अश्या प्रकारे २ दिवस किस वळवावा . सुपारी तयार.

हि सुपारी पांढरीच दिसते. आल्यामुळे आवळ्याचा आंबटपणा कमी होतो म्हणून आलं नक्की टाकावे.


No comments:

Post a Comment