Friday, July 8, 2011

रव्याचा शिरा

साहित्य - १ वाटी बारीक़ रवा, १ वाटी पातळ साजुक तुप , १ वाटी साखर,१ वाटी दूध , काजू , बेदाणे, वेलची पूड


कृति - प्रथम तुपावर काजू , बेदाणे तळून घ्या .बेदाणे टम्म फुगले की बाहेर काढून घ्या.तुपामध्ये रवा गुलाबीसर रंगावर खमंग भाजून घ्या. मग त्यात दूध घालून नीट मिक्स करून घ्या .साखर घालून वर खालून नीट हलवून घ्या आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या .पुन्हा हलवून एक वाफ येऊ द्या . बाजूने तुप सुटले की गैस बंद करा. मग काजू , बेदाणे, वेलची पूड घालून serve करा ।



शिरयामध्ये केळ घालायचे असल्यास सर्वात आधी केळ कुस्करून अर्धवट तळून घ्या आणि शिरा झाल्यावर वरून मिक्स करा म्हणजे चांगला स्वाद येतो.ह्या शिरयालाच सत्यनारायणाचा प्रसाद म्हणतात.



No comments:

Post a Comment